नुकतेच केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान आणि प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे ७ व्या 'ॲग्रीव्होल्टेइक जागतिक परिषदेचे (Agrivoltaics World Conference)' उद्घाटन करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे:
- श्री. शिवराज सिंह चौहान (केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री) आणि श्री. प्रल्हाद जोशी (केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री) यांनी नवी दिल्लीतील 'भारत मंडपम' येथे ७ व्या 'ॲग्रीव्होल्टेइक वर्ल्ड कॉन्फरन्स'चे उद्घाटन केले.
- २१ ते २३ ऑक्टोबर २०२६ दरम्यान आयोजित केलेली ही तीन दिवसीय परिषद
- संकल्पना / थीम (Theme): 'पॉवरिंग द ग्लोबल साऊथ (Powering the Global South)' या संकल्पनेवर आधारित ही परिषद होती.
- भारतात आणि विशेषतः विकसनशील देशांच्या प्रदेशात आयोजित झालेली ही पहिलीच परिषद ठरली ही या परिषदेची खास बाब आहे.
ॲग्रीव्होल्टेइक जागतिक परिषदेबाबत महत्वपूर्ण माहिती:
- नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयामार्फत जर्मनीच्या 'फेडरल मिनिस्ट्री फॉर द एन्व्हायर्नमेंट, क्लायमेट ॲक्शन, नेचर कन्झर्व्हेशन अँड न्यूक्लियर सेफ्टी' च्या सहकार्याने तसेच 'कोनेक्सिओ-पीएसई (Conexio-PSE)' सोबत भागीदारी करून सदर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
- २०२७ मध्ये होणाऱ्या ८ व्या 'ॲग्रीव्होल्टेइक वर्ल्ड कॉन्फरन्स'च्या आयोजनाची जबाबदारी अधिकृतपणे फ्रान्सकडे सोपवण्यात आली आहे.